प्रवेश पत्रावरील आपल्या पाल्याची / विद्यार्थ्याची सर्व माहिती (नाव, इयत्ता, माध्यम, शाळेचे नाव इ. ) तपासून घ्यावी. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास आमच्या अधिकृत समन्वयकास त्वरित सुचित करावे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेस येताना स्वतः बरोबर प्रवेश पत्र, पॅड तसेच परीक्षेसाठी आवश्यक असणारे लेखन साहित्य व आपल्या गरजेच्या वस्तू (पाण्याची बाटली, जेवण डब्बा इ.) सोबत आणाव्यात.
बैठक व्यवस्थेस संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्था प्रतिनिधी हजर आहेत, त्यामुळे पालकांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करू नये.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने आण करण्याची जबाबदारी संबंधित पालकावर राहील.
परीक्षेत होणारे गैरवर्तन चुकीचा हस्तक्षेप या संबंधित आलेल्या तक्रारीची शहानिशा करून दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येईल.
परीक्षा विषयी सर्व माहिती (प्रवेश अर्ज नमुना, प्रवेश पत्र, निकाल, सर्व नियम व अटी) पाहण्यासाठी मागील पानावरील QR कोड स्कॅन करावा किंवा Visit करा https://manthanwelfarefoundation.org/
परीक्षेविषयीच्या कायदेशीर बाबी ‘जिल्हा न्यायालय, अहमदनगर’ यांच्या कक्षेअंतर्गत येतील.
परीक्षेसंदर्भातील प्रवेश अर्ज व प्रवेश पत्रावरील सर्व नियम व सूचना मी वाचलेले आहेत, त्या मला स्वेच्छेने मान्य आहेत याबाबत पालकाची स्वाक्षरी बंधनकारक असेल.
Scroll to Top
Feedback
आपल्या पाल्याला मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेमध्ये सहभागी करून त्याच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्था आपली आभारी आहे.
कृपया आपला बहुमूल्य अभिप्राय नोंदवून आमच्या गुणवत्तावाढी साठी सहकार्य करा.